ते धर्माला घट्ट राहणार तर आम्हीसुद्धा आमच्या धर्माल घट्ट राहणार- राज ठाकरे
ते त्यांच्या धर्माला घट्ट राहणार असतील तर आम्हालाही आमच्या धर्माला घट्ट राहावं लागेल. तुमच्या सणासुदीला लाऊडस्पीकर लागतो तर समजू शकतो. पण 365 दिवस तुम्ही लावत असाल तर आम्हाला नाही ऐकायचं ते, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भोंग्यांवरून आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. हा विषय एक दिवसाचा नाही. महाराष्ट्र सैनिक आणि हिंदू बांधवांना हेच सांगायचं हा विषय एका दिवसाचा नाही. ज्या मशिदीत भोंगे लागेल त्या ठिकाणी हनुमान चालिसा दुप्पट लावा. पोलीस मुंबईतील 135 मशिदींवर काय कारवाई करणार आहे. ते आम्हाला एकदा समजू देत. ते त्यांच्या धर्माला घट्ट राहणार असतील तर आम्हालाही आमच्या धर्माला घट्ट राहावं लागेल. तुमच्या सणासुदीला लाऊडस्पीकर लागतो तर समजू शकतो. पण 365 दिवस तुम्ही लावत असाल तर आम्हाला नाही ऐकायचं ते, असं राज ठाकरे म्हणाले.
Published on: May 04, 2022 02:55 PM
Latest Videos