Pune | MNS | नाशिकनंतर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, पुण्यात मनसे रेस्क्यू पथकाची स्थापना
पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा केली आहे.
पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपत्ती व्यवस्थापन पथकाची घोषणा केली आहे. पूर, इमारत दुर्घटना यासारख्या संकट काळात हे आपत्ती व्यवस्थापन पथक प्रशासनाच्या मदतीला येईल. हे मनसेचे राज्यातील पहिले आपत्ती व्यवस्थापन पथक स्थापन केले आहे. पुणे शहरातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपैकी 50 प्रशिक्षित पुरुष आणि महिला यांचा पथकात समावेश असेल. आपत्ती व्यवस्थापन पथकातील कार्यकर्त्यांना मनसे प्रशिक्षण देणार आहे. पुणे शहरात सतत नैसर्गिक आपत्ती कोसळत असते. त्यासाठी 50 जणांचे प्रशिक्षित मनसे रेस्क्यू पथक कार्यरत असेल. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नाशिकनंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा ‘राजसंवाद’ हा दौरा सुरु आहे.
Latest Videos