MNS : राज ठाकरे यांचा पक्ष खंडणीखोर, मनसे पदाधिकाऱ्याच्या गंभीर आरोपानं खळबळ
माथाडी कामगार प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांनी मारहाण केल्याचेही त्याच पदाधिकाऱ्याने म्हटले आहे. कामगारांची बाजू सोडत नाही म्हणून मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा दावाही या मनसे पदाधिकाऱ्याने केलाय.
मुंबई, ९ जानेवारी २०२४ : महाराष्ट्र नवनिर्मान सेना अर्थात मनसे या राज ठाकरे यांच्या पक्षावर मनसेच्या पदाधिकाऱ्यानेच गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे. तर माथाडी कामगार प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांनी मारहाण केल्याचेही त्याच पदाधिकाऱ्याने म्हटले आहे. कामगारांची बाजू सोडत नाही म्हणून मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा दावा मनसेच्या मराठी कामगार सेनेचा अध्यक्ष महेश जाधव यांनी केलाय. महेश जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप ठाकरेंवर केला आहे. “मी महेश जाधव. मी आता राजगडमध्ये कामागरांची बाजू घेतली म्हणून अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला. हे ठाकरे आहेत की गुंड आहेत? अमित ठाकरेंसारख्या माणसाला हे शोभत नाही. अमित ठाकरे यांनी माझ्यावर हात उचलला. त्यांना 800 हजार कामगारांचा तळतळाट त्यांना लागेल”, असं महेश जाधव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.