'मोदींना तुरूंगात जाण्यापासून शरद पवार यांनी वाचवलं'; मनसेच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

‘मोदींना तुरूंगात जाण्यापासून शरद पवार यांनी वाचवलं’; मनसेच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

| Updated on: Aug 14, 2023 | 7:34 PM

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सलोख्याचे संबंध कसे?; राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नेमकी काय सांगितली इन्साईड स्टोरी, बघा...

मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधावरही भाष्य केले आहे. नरेंद्र मोदी यांना तुरुंगात जाण्यापासून शरद पवारांनी वाचवलं होतं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे सलोख्याने संबंध राहिले आहेत. त्यामुळेच पवारांनी मोदी धार्जिणे राजकारण केलं आहे. मध्यंतरी पवार आणि मोदी एकाच मंचावर पाहायला मिळाले. मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. राष्ट्रवादीत फूट पडली. त्यानंतर हे दोन नेते भेटले. तरीही दोघांची देहबोली सकारात्मक होती, याकडे राज ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे, अशी माहिती समोर आली आहे. तर यावेळी राज ठाकरे असेही म्हणाले की, मला भाजपची ऑफर आली आहे. युती करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. पण मी कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही. भाजपसोबत एकनाथ शिंदे आहेत. आता अजित पवारही आहेत. अजित पवार यांचं भाजप काय करणार आहे हे माहीत नाही. युतीचं नेमकं गणित काय असेल याबाबतही काहीच स्पष्टता नाहीये. त्यामुळे मी अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

Published on: Aug 14, 2023 07:29 PM