Raj Thackeray : राज ठाकरेंचा वार, आव्हाडांचा सणसणीत पलटवार, संजय राऊतांचीही टीका
राज ठाकरे यांना भोंग्यांची आताच आठवण झाली का? एवढे दिवस कुठे झोपले होते? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. अजितदादांच्या या प्रश्नाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे.
मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भोंग्यांची आताच आठवण झाली का? एवढे दिवस कुठे झोपले होते? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केलं होतं. अजितदादांच्या या प्रश्नाचा मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. भोंग्यांबाबतची माझी भूमिका आजची नाहीये. जुनीच आहे. या मुद्द्यावर मी वारंवार बोललो आहे. माझी मेमरी शार्प आहे. मी कधी काय बोललो हे मला अजूनही आठवतं. त्यामुळे अजितदादा मी तुमच्यासाठी तीन व्हिडिओ आणले आहेत. ते जरा एकदा पाहूनच घ्या, असं सांगत राज ठाकरे यांनी भरसभेत त्यांच्या भाषणाचे तीन व्हिडीओ दाखवले. या व्हिडीओत राज ठाकरे हे भोंग्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत. राज यांच्या या लाव रे तो व्हिडीओमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तसेच आता प्रत्येक सभेत राज ठाकरे व्हिडीओ दाखवूनच विरोधकांना प्रत्युत्तर देणार असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेवर शिवसेना नेते संजय राऊतांनीही टीका केली आहे.