Raj Thackeray | बाबासाहेबांनी शिवचरित्र घरा-घरात, मना-मनात पोहोचवलं : राज ठाकरे
“अनेकांनी शिवचरित्र लिहिलं, पण बाबासाहेब पुरंदरेंंनी शिवचरित्र घराघरात, मनामनात पोहोचवलं… बाबासाहेबांची इतिहास सांगायची एक पद्धत आहे. ते तुम्हाला समजेल, रुचेल अश्या पद्धतीने इतिहास सांगतात. दंतकथांना त्यांच्या लिखाणात वाव नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.
पुणे येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे 100 व्या वर्षात पदार्पण करत असल्यानिमित्त सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित होते. “अनेकांनी शिवचरित्र लिहिलं, पण बाबासाहेब पुरंदरेंंनी शिवचरित्र घराघरात, मनामनात पोहोचवलं… बाबासाहेबांची इतिहास सांगायची एक पद्धत आहे. ते तुम्हाला समजेल, रुचेल अश्या पद्धतीने इतिहास सांगतात. दंतकथांना त्यांच्या लिखाणात वाव नाही”, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणाचा सन्मान केला. तसंच त्यांच्या इतिहासावर आक्षेप घेणाऱ्या टीकाकारांना अप्रत्यक्षपणे राज यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
Latest Videos