Special Report | लोकांनी एकाचवेळी 3 वेळा बटणं का दाबावी? प्रभाग रचनेवरून राज ठाकरेंचा संताप
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. सत्ता काबीज करण्याचा डाव असून सोयीनुसार प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. प्रभागांची तोडफोड करुन आपल्याला हवे तसे प्रभाग करणे योग्य नाही. लोकांनी एकाऐवजी तीन तीन बोटं का दाबायची. निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहेय कायदे वेगवेगळे का ? 2-3-4 प्रभाग हा खेळ कसला? उद्या 2-2 आमदारांचा, खासदारांचा प्रभाग करणार आहे का? ग्राम पंचायत, जिल्हा परिषदेला प्रभाग नाही, महापालिकेला प्रभाग का? यांच्या फायद्यासाठी हे आहे का? आम्ही आमचे मार्ग अवलंबू, पण आता लोकांनी विरोध करावा, कोर्टात जावं, निवडणूक आयोगाकडे जावं, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.
Latest Videos