महाराष्ट्र भाग्यवान, माझा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास पण… राज ठाकरे यांच्या ‘त्या’ व्हिडीओची पुन्हा चर्चा
घोसाळकर हत्याप्रकऱणानंतर अख्खं महाराष्ट्र सुन्न झालं आहे. तर हे महाराष्ट्र की बिहार? राज्यात नेमकं घडतंय काय? असा सवाल आणि भिती आता सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.
मुंबई, ९ फेब्रुवारी २०२४ : पूर्व वैमनस्यातून ठाकरे गटाचे माजी नगरसवेक अभिषेक घोसाळकरांची गुंड मॉरिसने हत्या केली आहे इतकंच नाहीतर नंतर त्याने स्वतःलाही संपवलं. या हत्याप्रकऱणानंतर अख्खं महाराष्ट्र सुन्न झालं आहे. तर हे महाराष्ट्र की बिहार? राज्यात नेमकं घडतंय काय? असा सवाल आणि भिती आता सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कायदा सुव्यवस्थेबाबत केलेलं राज ठाकरे यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या, असं त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते. मनसेने राज ठाकरे यांच्या त्या जुन्या शेअर करत ‘राज्यातील बेछूट गोळीबार, टोळीयुद्ध, गुन्हेगारांचा मुक्त संचार, कोयता गॅंगचा उच्छाद, मुलींचं अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या…’, असे कॅप्शन दिलंय.