Special Report : राज ठाकरेंकडून नुपूर शर्मांचं समर्थन, तर टार्गेटवर अकबरुद्दीन ओवैसी

Special Report : राज ठाकरेंकडून नुपूर शर्मांचं समर्थन, तर टार्गेटवर अकबरुद्दीन ओवैसी

| Updated on: Aug 23, 2022 | 11:31 PM

जे अकबरुद्दीन ओवैसी हिंदू देव-देवतांबद्दल अपमानास्पद बोलतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय. अकबरुद्दीन ओवैसी कायम वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. औरंगाबाद दौऱ्यातही त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवून वाद ओढवून घेतला होता. राज ठाकरे यांना अकबरुद्दीन ओवैसींच्या ज्या वक्तव्याबद्दल आक्षेप आहे.

ज्या नुपूर शर्मांना भाजपनं पक्षातून निलंबित केलं त्या नुपूर शर्मांचं राज ठाकरेंनी समर्थन केलं आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं नुपूर शर्मा वादात अडकल्या. मुस्लीम देशांनी भारताकडे नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर भाजपला नुपूर शर्मांवर कारवाई करावी लागली. पण राज ठाकरेंनी आज नुपूर शर्मांचं समर्थन करत झाकीर नाईक यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे ज्या झाकीर नाईकबद्दल बोलले तो झाकीर नाईक आहे तरी कोण? तर झाकीर नाईक हा इस्लाम धर्मप्रचारक आहे. पेशानं डॉक्टर आणि प्रभावी बोलण्यामुळं जगभरात प्रसिद्ध आहे. मूळचे कोकणी मुसलमान असलेल्या झाकीर नाईकची मुंबईतल्या डोंगरी भागात इस्लामचा प्रचार करणारी संस्थाही होती. त्याचं पीस टीव्ही नावाचं चॅनेल आहे. याच चॅनेलवरची नाईक याची भाषणं ऐकून प्रभावित झालेल्या अतिरेक्यांनी बांग्लादेशात हल्लेही केले होते. झाकीर नाईक सध्या केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएच्या रडारवरही आहेत. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर भारतातही बंदी घालण्यात आलीय.

नुपूर शर्मांचं समर्थन करताना राज ठाकरेंनी अकबरुद्दीन ओवैसींवरही निशाणा साधला. जे अकबरुद्दीन ओवैसी हिंदू देव-देवतांबद्दल अपमानास्पद बोलतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय. अकबरुद्दीन ओवैसी कायम वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. औरंगाबाद दौऱ्यातही त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवून वाद ओढवून घेतला होता. राज ठाकरे यांना अकबरुद्दीन ओवैसींच्या ज्या वक्तव्याबद्दल आक्षेप आहे. नुपूर शर्मांच्या विषयावरुन काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी भाजपला घेरलं होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याचे पडसाद उमटले होते. त्यामुळं हिंदुत्वाचा पुकार करणाऱ्या भाजपची चांगलीच अडचण झाली होती. नुपूर शर्मांना निलंबित करुन भाजपनं एक पाऊल मागेही घेतलं. मात्र राज ठाकरे आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत, ते पहिल्या दिवसापासून नुपूर शर्मा यांचं समर्थन करतायत.

 

Published on: Aug 23, 2022 11:31 PM