Shivsena Bhavan : ‘अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..’, शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी
Thackeray Brother Unity Banners : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना युतीची साद घातल्यावर मुंबईत ठिकठिकाणी मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून बॅनरबाजी केली जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना युतीची साद घातल्यावर आता त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा राज्यात सुरू आहे. शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्याकडून ठाकरे बंधु एकत्र यावे अशी भावना व्यक्त केली जाते आहे. तर काहींनी ही युती नको असल्याचं म्हंटलं आहे. मात्र आता ठाकरे बंधूंनी एकत्र यवन यासाठी ठिकठिकाणी मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी केली जाते आहे. दादरच्या शिवसेना भवन समोरच आता पार्ले पंचम तर्फे आता ठाकरेंच्या युतीचा बॅनर लागलेला बघायला मिळाला आहे. ‘ठाकरे बंधूंनो लवकर एकत्र या, आणि लवकर एकत्र या अशा आशयाचे हे बॅनर आहेत. त्यावर उद्धव आणि राज ठाकरेंचा एकमेकांना मिठी मारलेला AI च्या माध्यमातून तयार केलेला फोटो छापण्यात आलेला आहे.

इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी

पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन

भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
