चंद्रकांत पाटील यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर मनसेकडून राज ठाकरे यांचा व्हिडीओ ट्वीट, बघा काय म्हणाले...

चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मनसेकडून राज ठाकरे यांचा व्हिडीओ ट्वीट, बघा काय म्हणाले…

| Updated on: Apr 11, 2023 | 4:24 PM

VIDEO | राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ मनसेकडून ट्विट, बाबरी मशिदीबाबत राज ठाकरे यांनी कोणता सांगितला प्रसंग, बघा व्हिडीओ

मुंबई : भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिद पाडण्याच्या मुद्द्यावरून केलेल्या व्यक्तव्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाबरी मशिदीच्या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या व्यक्तव्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. दरम्यान, यासंदर्भात मनसेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. मनसेने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये बाबरी मशिद आणि शिवसेनेचा सहभाग यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. तर या व्हिडीओला ‘अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी राज ठाकरे यांनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐकावा !’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.

Published on: Apr 11, 2023 04:22 PM