Special Report | कृष्णकुंजच्या बाजुलाच राज ठाकरे घेणार नवं घर!

| Updated on: Nov 05, 2021 | 9:32 PM

इमारतीत पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे याच इमारतीत आता नवे कार्यालयदेखील असल्याची माहिती पुढे येत असून, याठिकाणी भेटीगाठी आयोजित केल्या जाणार आहेत.

मुंबई : राज ठाकरे हे भाऊबीजेच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश करणार असल्याचे समजते. दादर येथील ‘कृष्णकुंज’शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे. यामध्ये राज कुटुंबासह गृहप्रवेश करणार असल्याचे कळते. यासाठी जय्यत तयारी सध्या सुरू असून, या नव्या इमारतीला ते काय नाव देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. नव्या पाच मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे याच इमारतीत आता नवे कार्यालयदेखील असल्याची माहिती पुढे येत असून, याठिकाणी भेटीगाठी आयोजित केल्या जाणार आहेत. त्याशिवाय इतर मजल्यांवर ठाकरे कुटुंबीयांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या इमारतीत सुसज्ज सोयी-सुविधा आणि भव्य ग्रंथालयदेखील उभारण्यात आले आहे. या नव्या इमारतीतील सर्व काम सध्या पूर्ण झाले असून, लवकरच ठाकरे कुटुंब याठिकाणी दाखल होणार असल्याचे सांगण्यात येते.