Raj Thackeray | राज ठाकरे लवकरच नव्या घरात गृहप्रवेश करणार
राज ठाकरे हे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर लवकरच नव्या घरात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज यांचे नवे घर दादर येथील त्यांचे सध्याचे निवासस्थान असलेल्या 'कृष्णकुंज' शेजारीच आहे.
राज ठाकरे हे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर लवकरच नव्या घरात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज यांचे नवे घर दादर येथील त्यांचे सध्याचे निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’ शेजारीच आहे. ‘कृष्णकुंज’ शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे. या नव्या निवासस्थानी राज ठाकरे लवकरच आपल्या कुटुंबासह प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी सध्या जय्यत तयारी सुरू असून, राज ठाकरे या इमारतीला काय नाव देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही नवी इमारत सर्व सुविधांनीयुक्त असून, राज ठाकरे लवकरच आपल्या कुटुंबासह या इमारतीमध्ये राहाण्यासाठी जाणार आहेत.
Latest Videos