BJP MNS Yuti | राज ठाकरेंची सदिच्छा भेट, चर्चेत युतीचा प्रस्ताव नाही : चंद्रकांत पाटील
संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली होती की या दोन बड्या नेत्यांमध्ये कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली? राज ठाकरेंना भेटून आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेरुनच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा तपशील सांगितला.
“आजच्या बैठकीत युतीची कोणतीही चर्चा झाली नाही. राजकीय चर्चा झाली असं म्हणता येईल, पण युतीची चर्चा नाही तर एकमेकांच्या भूमिकेांविषयी चर्चा झाली. कारण त्यांच्या परप्रातीयांद्दलच्या काही भूमिका मला समजून घ्यायच्या होत्या. कुठल्याही माणसाच्या दोन भूमिका असतात, एक माणूस म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून.. माणूस म्हणून मला त्यांच्या भूमिकांवर चर्चा करायची होती. त्यासाठी आजची भेट झाली”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच ‘कृष्णकुंज’वर ही भेट झाली. उभय नेत्यांमध्ये जवळपास 40 ते 45 मिनिटे चर्चा झाली. राज ठाकरेंना भेटून आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेरुनच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा तपशील सांगितला.