भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार- राज ठाकरे
एका दिवसापुरतं हे आंदोलन नाही. आमचं आंदोलन सुरूच राहणार. जोपर्यंत मशिदींवरील भोंगे (LoudSpeaker Ban) उतरवले जात नाहीत. तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार, असं सांगतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाने (supreme court) ठरवून दिलेल्या आवाजाच्या डेसिबलचीही आठवण करून दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी आज पुन्हा एकदा भोंग्यांवरून राज्य सरकारला इशारा दिला आहे. एका दिवसापुरतं हे आंदोलन नाही. आमचं आंदोलन सुरूच राहणार. जोपर्यंत मशिदींवरील भोंगे (LoudSpeaker Ban) उतरवले जात नाहीत. तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार, असं सांगतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाने (supreme court) ठरवून दिलेल्या आवाजाच्या डेसिबलचीही आठवण करून दिली. मशिदी आणि मंदिरांवरचे भोंगेही उतरवले पाहिजे. काल विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलं इतक्या मशिदींना भोंग्यांसाठी परवानगी दिली. जिथे मशिदीच अनधिकृत आहेत. अनधिकृत मशिदींना भोंगे लावण्यासठी सरकार अधिकृत परवाने देत आहे. ही कल्पनेबाहेरची गोष्ट आहे. कशासाठी देता परवानगी? सकाळच्या अजानपुरता हा विषय नाही. चार ते पाच वेळा बांग दिली जाते. ती जर त्यांनी परत दिली. तर आमचे लोकं हनुमान चालिसा त्या त्या वेळी वाजवणार म्हणजे वाजवणारच, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.