उद्या औरंगाबादेत राज ठाकरेंची सभा, मनसेचे बडे नेते औरंगाबादच्या दिशेने रवाना
उद्या राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेचे बडे नेते औरंगाबादमध्ये दाखल होत असल्याचे पहायला मिळत आहे. आज दुपारी संदीप देशपांडे आणि राजू पाटील देखील औरंगाबादमध्ये येणार आहेत.
उद्या एक मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेची सध्या जय्यत तयारी सुरू असून, तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या जवळपास सर्वच मोठ्या नेत्यांचा तळ औरंगाबादमध्ये पहायला मिळणार आहे. मनसे नेते संदीप देशपांडे आणि राजू पाटील आज दुपारी औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत. तर अमित ठाकरे त्याआधीच औरंगाबादमध्ये पोहोचले आहेत. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Latest Videos

त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत

लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं

'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल

'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
