मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं 5 मजल्यांचं नवं घर कसं असेल?, पाहा EXCLUSIVE VIDEO

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं 5 मजल्यांचं नवं घर कसं असेल?, पाहा EXCLUSIVE VIDEO

| Updated on: Nov 06, 2021 | 11:41 AM

सणासुदीच्या काळात सगळेच जण नवं काहीतरी खरेदी करण्याच्या प्रयत्न करत असतात. यंदा दिवाळीचा मुहूर्त साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुभकार्य करणार आहेत. राज ठाकरे नव्या घरात गृहप्रवेश करणार आहे. त्यांचं अगोदरचं निवासस्थान असलेल्या 'कृष्णकुंज' शेजारीच त्यांचं हे नवं घर आहे. 'शिवतीर्थ' असं त्यांच्या नव्या घराचं नाव आहे.

मुंबई : सणासुदीच्या काळात सगळेच जण नवं काहीतरी खरेदी करण्याच्या प्रयत्न करत असतात. यंदा दिवाळीचा मुहूर्त साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुभकार्य करणार आहेत. राज ठाकरे नव्या घरात गृहप्रवेश करणार आहे. त्यांचं अगोदरचं निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’ शेजारीच त्यांचं हे नवं घर आहे. ‘शिवतीर्थ’ असं त्यांच्या नव्या घराचं नाव आहे. त्यामुळे आता मनसैनिकांना कोणत्याही कामासाठी ‘शिवतीर्थ’वर यावं लागेल. कृष्णकुंज हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं अगोदरचं निवासस्थान… मात्र त्यांनी कृष्णकुंज या आपल्या घराच्या बाजूलाच आणखी एक नवं घर बांधलं आहे. राज ठाकरे आज म्हणजेच 6 नोव्हेंबर रोजी आपल्या पाच मजली घरात राहायला जाणार आहेत. हे घर सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे. भाऊबीजेच्या मुहूर्तावर ते आपल्या नव्या घरात कुटुंबासोबत राहायला जातील.

Published on: Nov 06, 2021 11:41 AM