शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये 4 आमदारांसह..., राजन विचारेंचा मोठा गौप्यस्फोट

शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये 4 आमदारांसह…, राजन विचारेंचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: May 08, 2024 | 1:23 PM

'एकनाथ शिंदे हे 2013 सालीच फुटणार होते. एकनाथ शिंदे यांना शिवसेना संपवायची होती. तुम्ही काय पक्ष वाढवला? जिल्ह्यात किती आमदार होते? सेटिंग करत राहिलात, याला फोडं, त्याला फोडं, कुठला पक्ष सोडलात सांगा,', असं वक्तव्य करत राजन विचारे यांनी एकनाथ शिंदेंवर घणाघात केला.

एकनाथ शिंदे 2013 सालीच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. कुठल्या पक्षाशी तुम्ही प्रामाणिक राहिलात? स्वत:सह मिळून पाच आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा दावा महाविकास आघाडीचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांनी केला आहे. इतकंच नाहीतर एकनाथ शिंदे हे 2013 सालीच फुटणार होते. एकनाथ शिंदे यांना शिवसेना संपवायची होती. तुम्ही काय पक्ष वाढवला? जिल्ह्यात किती आमदार होते? सेटिंग करत राहिलात, याला फोडं, त्याला फोडं, कुठला पक्ष सोडलात सांगा, अशा शब्दात राजन विचारे यांनी हल्ला चढवला. तर एकनाथ शिंदे 2013 सालीच चार आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र त्यावेळी आम्ही काँग्रेसच्या तिकीटावर कसे निवडून येणार? असं चार आमदारांनी विचारलं, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं बंड फसलं, असा मोठा गौप्यस्फोटही राजन विचारे यांनी केला.

Published on: May 08, 2024 01:23 PM