राजस्थानमध्ये काँग्रेसला खिंडार, ‘या’ बड्या नेत्याचा शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
VIDEO | महाराष्ट्रानंतर आता राजस्थानातही शिंदे गटाची ताकद वाढणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळचे सहकारी राजेंद्र गुढा यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
जयपूर, ९ सप्टेंबर २०२३ | राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रानंतर आता राजस्थानमध्ये शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. राजस्थानमधील काँग्रेसचा बडा नेता आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळचे सहकारी राजेंद्र गुढा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राजेंद्र गुढा यांनी शिवसेनेत प्रवेशाने राजस्थानात काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याची चर्चा होताना दिसतेय. राजेंद्र गुढा यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे राजस्थानच्या झुनझुनमध्ये गेले होते. यावेळी जाहीर कार्यक्रमात राजेंद्र गुढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.