पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यास पालकांनी सहकार्य करावं, राजेश टोपेंचं आवाहन

पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करण्यास पालकांनी सहकार्य करावं, राजेश टोपेंचं आवाहन

| Updated on: Nov 24, 2021 | 2:43 PM

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाची पहिली ते चौथी वर्ग सुरु करण्यास कोणती अडचण नसल्याचं म्हटलं आहे. राज्य सरकारनं पहिली ते चौथीच्या वर्ग सुरु करण्यास परवागनगी दिल्यानंतर पालकांनी शाळा सुरु करण्यास परवानगी द्यावी, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल. येत्या 10 दिवसात याबाबत निर्णय होईल, असही राजेश टोपे म्हणाले.पहिली ते चौथीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन सुरु करण्यास परवानगी द्यावी यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्सनं परवानगी द्यावी असं मत मांडलं आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आणि कॅबिनेटला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाची पहिली ते चौथी वर्ग सुरु करण्यास कोणती अडचण नसल्याचं म्हटलं आहे. राज्य सरकारनं पहिली ते चौथीच्या वर्ग सुरु करण्यास परवागनगी दिल्यानंतर पालकांनी शाळा सुरु करण्यास परवानगी द्यावी, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.