Rajesh Tope | राज्यात Lockdown लागणार का? या प्रश्नावर टोपे म्हणाले…| Omicron Corona
राजेश टोपे म्हणाले की, राज्यात कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या हा धोक्याचा अलार्म आहे. दोन दिवसांमध्ये रुग्णांची दुप्पट वाढ झाली आहे. त्यात मुंबईचा पॉझिटिव्हीची रेट हा चार टक्क्यांवर गेला आहे. ही परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दोन दिवसांत रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन दिवसांत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
राजेश टोपे म्हणाले की, राज्यात कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या हा धोक्याचा अलार्म आहे. दोन दिवसांमध्ये रुग्णांची दुप्पट वाढ झाली आहे. त्यात मुंबईचा पॉझिटिव्हीची रेट हा चार टक्क्यांवर गेला आहे. ही परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ याबाबत निर्णय घेईल.