Chief Election Commissioner : मुख्य निवडणूक आयुक्तपदी राजीव कुमार, 15 मे रोजी स्वीकारणार पदभार

Chief Election Commissioner : मुख्य निवडणूक आयुक्तपदी राजीव कुमार, 15 मे रोजी स्वीकारणार पदभार

| Updated on: May 12, 2022 | 4:32 PM

राजीव कुमार हे 1984च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 2 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता.

नवी दिल्ली : देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) पदी राजीव कुमार यांचं नाव घोषित झालंय. 15 मे रोजी ते पदभार स्वीकारतील. यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुनील चंद्रा हे 14 मे रोजी निवृत्त होत आहेत. राजीव कुमार हे 1984 च्या बॅचचे आयएएस (IAS)अधिकारी आहेत. 2 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. तर ते 15 मे 2022 ते 18 फेब्रुवारी 2025 या कालावधीत देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार सांभाळतील.

Published on: May 12, 2022 04:30 PM