सोमय्यांच्या आरोपांना ‘चहावाले’ राजीव साळुंखे यांचे प्रत्युत्तर; पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळ्याचा केला होता आरोप
सध्या पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरचा (jumbo covid centre) वाद चांगलाच गाजत आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला आहे. किरीट सोमय्यांच्या आरोपांना राजीव साळुंखे यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई: सध्या पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरचा (jumbo covid centre) वाद चांगलाच गाजत आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला आहे. विशेष म्हणजे एका चहावाल्याला या कोव्हिड सेंटरचं कंत्राट ठाकरे सरकारनं दिलं. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी या चहावाल्याचे जवळचे संबंध असल्यानेच त्याला कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केलं आहेत. दरम्यान किरीट सोमय्या यांनी ज्या चहावाल्यावर हे आरोप केले आहेत त्या राजीव साळुंखे यांनी देखील सोमय्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. राजीव साळुंखे यांनी हे आरोप खोडून काढले आहेत. आम्ही काही चोरी केली नाही. रितसर सरकारच्या नियमानुसार आम्ही टेंडर मिळवलं आहे. त्यांना कुठून खोटी माहिती मिळाली माहीत नाही. सोमय्या सारखं चहावाला चहावाला असं म्हणत आहेत. माझ्या हॉटेलला जवळजवळ 70 वर्ष झाले आहेत. तेव्हा सोमय्यांचा जन्मही झाला नसेल. सोमय्या माझ्यावर चुकीचे आरोप करत आहेत. मी सर्व डिटेल्स देईल. निश्चितपणे देणार आहे. मी मुंबईतच आहे. पण वकिलासोबत आहे. खोटेनाटे आरोप सुरू आहेत. आम्हालाही उत्तर द्यावे लागणार आहे. त्या संदर्भानच मी वकिलांना भेटलो आहे, असं साळुंखे यांनी सांगितलं.