अजित पवार यांच्या बंडामागे शरद पवार? राजू शेट्टी काय म्हणाले? पाहा व्हिडीओ…
अजित पवारांनी केलेल्या बंडामागे शरद पवार यांचाच हात असल्याचा दावा काहीजन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाष्य केलं आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या काही सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांनी बंडानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रवादीच्या नावावर आणि चिन्हावरही दावा केला आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बंडखोर आमदारांची पक्षातून हाकालपट्टी करत राष्ट्रवादी हा पक्ष माझा आहे,असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. पण अजूनही अजित पवारांनी केलेल्या बंडामागे शरद पवार यांचाच हात असल्याचा दावा काहीजन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाष्य केलं आहे. ते नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 12, 2023 08:50 AM
Latest Videos