राजू शेट्टी यांचं तब्बल ७२ तास सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन संपलं, आंदोलन मागे घेण्याचं कारण काय?
VIDEO | देशभरात घडत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ राजू शेट्टी यांचं अन्नत्याग आंदोलन, तब्बल ७२ तासांनी आंदोलन संपलं
कोल्हापूर : मणिपूर आणि देशभरात घडत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात आणि त्याचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश आणि अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे. तब्बल 72 तासांपासून त्यांचं हे आंदोलन सुरू होते. दरम्यान हे आंदोलन अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मिळत असली तरी अन्नत्याग आंदोलना दरम्यान राजू शेट्टींची प्रकृती बिघडल्याचे समोर येत आहे. मणिपूरमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर राजू शेट्टी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये त्यांनी दोषींवर कडक कारवाई करावी आणि तेथील मुख्यमंत्री यांना या झालेल्या प्रकारचा जाब विचारावा असे म्हटले आहे. पंतप्रधानांनी या प्रकारणावर थेट कोणती प्रतिक्रिया दिली नाही, त्यामुळे देश कुठल्या दिशेने जात आहे, असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मणिपूरचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्यातील नेत्यांना केला. संविधान वाचवायचे असेल तर सर्वसामान्य जनतेने पुढे आले पाहिजे. महिलांवर अत्याचार इथून पुढे खपवून घेतले जाणार नाही, असे म्हणत त्यांनी 72 तासाचे आत्मकलेश, अन्नत्याग आंदोलन इचलकरंजी शहरातील गांधी पुतळा चौकामध्ये लोकशाही मार्गाने हे सुरू होते.