'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय, याबद्दल बोललं तर जीभ...', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?

‘राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय, याबद्दल बोललं तर जीभ…’, शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?

| Updated on: Oct 04, 2023 | 12:37 PM

VIDEO | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्यातील राजकारणावर बोलताना राजू शेट्टी यांनी शिंदे सरकारने राज्याच्या राजकारणाची गटारगंगा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर याबद्दल अधिक बोललो तर माझी जीभ विटाळेल असं भाष्य राजू शेट्टी यांनी केलं

सोलापूर, ४ ऑक्टोबर २०२३ | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली आहे. राज्यातील राजकारणावर बोलताना राजू शेट्टी यांनी शिंदे सरकारने राज्याच्या राजकारणाची गटारगंगा केल्याचे म्हटले आहे. तर याबद्दल अधिक बोललो तर माझी जीभ विटाळेल असं भाष्य करत राजू शेट्टी यांनी शिंदे सरकारवर खोचक टोला लगावला आहे. काल सोलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी मेळावा होता. या मेळाव्यात राजू शेट्टी यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी बोलत असताना राजू शेट्टी यांनी कोल्हापूरातील साखर कारखाने, उसाचे हफ्ते मिळत नसल्याने आक्रमक भूमिका घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तीन वेळा भेट घेतली. पण काहीही उपयोग झाला नसल्याचे त्यांनी म्हटले. ऊसाची रिकव्हरी तपासणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटमध्ये पवार लॉबी असल्याचे म्हणत त्यांनी गंभीर आरोप केला.

Published on: Oct 04, 2023 12:34 PM