‘… तर मग संभाजी भिडे यांच्यावर कारवाई का नाही?’, राजू शेट्टी यांचा सरकारला थेट सवाल
VIDEO | संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर राजू शेट्टी यांची तीव्र प्रतिक्रिया, आक्षेपार्ह विधानावरून राजू शेट्टी यांनी सरकारला घेरलं
पंढरपूर, ५ ऑगस्ट २०२३ | वादग्रस्त विधान करून राजकारण ढवळून काढणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला घेरलं आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. अशातच आता राजू शेट्टी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वर्षानुवर्ष ज्या महापुरूष दैवताची आपण पूजा करतो, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, महात्मा गांधी साऱ्या जगाचे दैवत आहेत त्यांचे जगभर अनुयायी आहे आणि यांच्याबद्दल अपशब्द काढणे चूकीचे आहे. जसं सगळे मोदी चोर म्हटल्यावर राहुल गांधींवर कारवाई होते मग संभाजी भिडे यांनी महात्मा फुले यांचा अपमान केला तर संभाजी भिडे यांच्यावर का कारवाई होत नाही, असा सवाल करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी संभाडी भिडे यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Published on: Aug 05, 2023 02:34 PM
Latest Videos