VIDEO : Rajya Sabha elections | Congress कडून मिलिंद देवरा,संजय निरुपम इच्छुक

VIDEO : Rajya Sabha elections | Congress कडून मिलिंद देवरा,संजय निरुपम इच्छुक

| Updated on: May 24, 2022 | 1:56 PM

भाजपमधून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे हे तीन सदस्य राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. तर काँग्रेस मिलिंद देवरा,संजय निरुपम इच्छुक आहेत. मात्र, भाजपच्या वाट्याला राज्यसभेच्या दोनच जागा येत आहेत. दोन जागा निवडून दिल्यावर भाजपकडे अतिरिक्त मते उरतात. पण त्यातून उमेदवार निवडून येणं शक्य नाही. त्यामुळे भाजप दोनच जागांवर आपले अधिकृत उमेदवार देणार आहे.

भाजपमधून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे हे तीन सदस्य राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. तर काँग्रेस मिलिंद देवरा,संजय निरुपम इच्छुक आहेत. मात्र, भाजपच्या वाट्याला राज्यसभेच्या दोनच जागा येत आहेत. दोन जागा निवडून दिल्यावर भाजपकडे अतिरिक्त मते उरतात. पण त्यातून उमेदवार निवडून येणं शक्य नाही. त्यामुळे भाजप दोनच जागांवर आपले अधिकृत उमेदवार देणार आहे. भाजपकडून पीयूष गोयल यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे. गोयल हे केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनाच पुन्हा संधी दिली जाणार आहे. तर विनय सहस्त्रबुद्धे हे संघाशी संबंधित आहेत. संघ आणि भाजपचा बुद्धिजीवी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. शिवाय केंद्राच्या अनेक आंतरराष्ट्रीय समित्यांवर ते कार्यरत आहे. पक्षालाही त्यांची गरज आहे. त्यामुळे सहस्त्रबुद्धे यांना संधी दिली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Published on: May 24, 2022 01:56 PM