भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, रक्षा खडसेंसोबत भाजप समर्थकांची बाचाबाची, व्हिडीओ व्हायरल
रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरून भाजपच्या अंतर्गत वाद-विवादाचा व्हिडीओ समोर आलाय. ज्यात रक्षा खडसे सोबत भाजपऐवजी शऱद पवार यांच्या राष्ट्रवादीचे समर्थक जास्त असल्याचा आरोप भाजप समर्थकांनी केलाय. हा सगळा प्रकार गिरीश महाजन यांच्यासमोर घडलाय.
रावेरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजप समर्थकांनी रक्षा खडसे यांच्या सोबत केलेल्या बाचाबाचीचा व्हिडीओही व्हायरल झालाय. भाजपनं दगड उभा केला तरी तो जिंकणार, असे म्हणत भाजप समर्थक मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे रक्षा खडसे यांची तक्रार करताय. रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवरून भाजपच्या अंतर्गत वाद-विवादाचा व्हिडीओ समोर आलाय. ज्यात रक्षा खडसे सोबत भाजपऐवजी शऱद पवार यांच्या राष्ट्रवादीचे समर्थक जास्त असल्याचा आरोप भाजप समर्थकांनी केलाय. हा सगळा प्रकार गिरीश महाजन यांच्यासमोर घडलाय. विशेष म्हणजे गिरीश महाजन रक्षा खडसे यांचं नाव का घेत नाही, असं कार्यकर्ते गिरीश महाजन समोर असतानाच बोलत होते. रक्षा खडसे भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरत असल्याने पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर प्रश्न उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे.