नागपुरातील भव्य अन् अनोख्या राखीची चर्चा; विद्यार्थी- शिक्षकांनी बनवली 30 बाय 53 फूट राखी
देशासह राज्यात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भावा-बहिणाचा रक्षाबंधन हा सण असतो. राजकीय नेते मंडळींपासून ते बॉलिवूड, मराठी कलाकार देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अशातच रक्षाबंधनाच्या निमित्ताने नागपुरात एका भव्य राखीची चर्चा होत आहे.
नागपूर येथील नूतन भारत शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येत एक मोठी भव्य अशी राखी बनवल्याचे समोर येत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून 30 फूट बाय 53 फूट अशी विशाल राखी बनविली आहे. या भव्य राखीचे वैशिष्ट्य म्हणजे पुनर्वापर करण्यात येणाऱ्या वस्तूंपासून ही राखी बनवण्यात आली आहे. इतकंच नाहीतर ही राखी विद्यार्थी आणि शिक्षकांकडून शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आली आहे. या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी यावर मेहनत घेतली असून ही भव्य अशी राखी साकारण्यात आली आहे. ही विशाल अशी राखी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साकारण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या प्रतिभाशक्तीला कुठेतरी चालना मिळत असल्याचे मत शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी व्यक्त केली आहे. बघा या भव्य दिव्य अशा राखीचा व्हिडीओ
Published on: Aug 19, 2024 03:40 PM
Latest Videos