औक्षण, गळाभेट अन् छानसं गिफ्ट; पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं बघा खास रक्षाबंधन

औक्षण, गळाभेट अन् छानसं गिफ्ट; पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं बघा खास रक्षाबंधन

| Updated on: Aug 19, 2024 | 5:06 PM

राखी पौर्णिमेला मुंडे परिवारातील बहिण-भावाची नेहमीच जोरदार चर्चा होत असते. राजकारणात एकमेकांचे विरोधक असणारे मात्र रक्ताचं नातं जपण्यात कधीच कमी पडत नाही. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे राखी पौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. बघा मुंडे बहिण भावाच्या रक्षाबंधन सणाचे खास क्षण

राज्याच्या राजकारणातील शरद पवार यांचं मोठं नाव असून शरद पवार यांचं पूर्ण कुटुंब नेहमीच एकत्रितपणे सर्व सण साजरे करताना दिसतात. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली होती. मात्र तरीही दिवाळीत अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येत आपली दिवाळी साजरी केली होती. यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे रक्षाबंधनाच्या दिवशी एकत्र येणार का याकडे साऱ्याचे लक्ष लागले होते. तर दुसरीकडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या रक्षबंधनाची देखील चर्चा सुरू आहे. पकंजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण करत त्यांना राखी बांधून आजचं रक्षाबंधन साजरं केलं. यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या लाडक्या बहिणीला छान गिफ्ट दिलं तर शेवटी एकमेकांनी गळाभेट घेत एकमेकांचा पाय देखील पडला.

Published on: Aug 19, 2024 05:05 PM