Ayodhya Ram Mandir : प्रभू रामाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज, बघा कुणी काय दिलं भव्य अन् अनोखं दान?
येत्या २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. अयोध्या नगरी प्रभू रामाच्या स्वागतासाठी सजली आहे. देशातील अनोख्या आणि भव्य-दिव्य वस्तू अयोध्येत दाखल झाल्या आहेत. देशातील अनेक रामभक्तांनी मोठा दान धर्म केलाय.
मुंबई, २१ जानेवारी, २०२४ : अयोध्या नगरी प्रभू रामाच्या स्वागतासाठी सजली आहे. देशातील अनोख्या आणि भव्य-दिव्य वस्तू अयोध्येत दाखल झाल्या आहेत. देशातील अनेक रामभक्तांनी मोठा दान धर्म केलाय. यामध्ये १०८ फुटांची अगरबत्ती अयोध्येत प्रज्वलीत करण्यात आली. ही अनोखी अगरबत्ती गुजरातच्या वडोदरा येथून पाठवण्यात आली आहे. ६ महिने तिच्या निर्मितीचं काम सुरू होतं. ही अगरबत्ती बनवताना विविध प्रकारची जडीबुटी, देशी गायीचं तूप आणि विविध सुंगधी द्रव्याचा लेप यावर लावण्यात आलाय. यासाठी ५ लाख रूपये खर्च आलाय. अलिगडमधून राम मंदिरासाठी ४०० किलोचं कुलूप, ३० किलोची चावी असून १० फूट उंच हे खुलूप मंदिर परिसरात ठेवलं जावं यासाठी पाठवण्यात आलंय. शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी ५ हजार लीटर गीर गायीचं तूप होम हवनासाठी पाठवलंय. प्राणप्रतिष्ठापणेच्या वेळी अक्षतांसाठी पालघरचा १० टन वाडा कोलम पाठवण्यात आलाय. तिरूपती तर्फे १ लाख तर उज्जैनकडून ५ लाख लाडू अयोध्येत पाठवण्यात आलेत. बघा आणखी काय भव्य दान अयोध्येत दाखल झालंय?