'पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद...', गोविंदगिरी महाराजांचं नाव न घेता राहुल गांधींवर टीकास्त्र

‘पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद…’, गोविंदगिरी महाराजांचं नाव न घेता राहुल गांधींवर टीकास्त्र

| Updated on: Nov 06, 2024 | 4:19 PM

Govindgiri Maharaj on Rahul Gandhi : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील एका कार्यक्रमात राम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. बघा व्हिडीओ काय म्हणाले...

‘पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद निर्माण करण्यासाठी फिरतंय.’, असं वक्तव्य राम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी केलं आहे. नाव न घेता गोविंदगिरी महाराज यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील एका कार्यक्रमात गोविंदगिरी महाराज यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘प्रत्येक महत्त्वपूर्ण देशाला नेस्तनाभूत करण्याकरता किती-किती विदेशी शक्ती सगळीकडून गिधाडांसारखं केवळ टपून बसले नाहीतर लचके तोडण्याकरता पुढे-पुढे घोंगावताय. त्यातील एक घुबड पप्पू नावाचं देशात सगळीकडे हिंडून-हिंडून, देशातील संस्कृतीचा नाश करण्याकरता जाती-पातींमध्ये मतभेद निर्माण कऱण्यासाठी प्रयत्न करतोय’, असं म्हणत गोविंदगिरी महाराज यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र डागलंय. बघा व्हिडीओ काय म्हणाले गोविंदगिरी महाराज? दरम्यान, गेल्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा लोकार्पणाचा भव्य कार्यक्रम पडला. यावेळी बोलताना गोविंदगिरी महाराज यांनी एक वक्तव्य केले. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. गोविंदगिरी महाराज यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना चुकीचा दाखला दिला होता.

Published on: Nov 06, 2024 04:19 PM