बागेश्वर बाबा, कालीचरण महाराजांवरून आव्हाड भडकलेच म्हणाले, या सरकारला...

बागेश्वर बाबा, कालीचरण महाराजांवरून आव्हाड भडकलेच म्हणाले, या सरकारला…

| Updated on: Apr 02, 2023 | 3:12 PM

दुसऱ्यांच्या श्रद्धास्थान वर बोलण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल बागेश्वर बाबाला करत महात्मा गांधीवर बोलण्याची लायकी आहे का असा सवाल कालीचरण महाराज यांना आव्हाड यांनी केला आहे

ठाणे : राज्यात एकीकडे रामनवमीनंतर वातावरण तंग झालेले असताना दुसरीकडे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा आणि कालीचरण महाराज हे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधला आहे. तसेच या राज्यात कोणी ही येऊन काहीही बोलतं. या सरकारला सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मजेशीर करून द्यायचा असंच दिसतं. तर संविधानातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरून बोलणाऱ्यांना गप्प केल जात आणि अशांना घ्या बोलून म्हणून मोकळीक दिली जाते असा टोला सरकारला लगावला आहे.

त्याचबरोर दुसऱ्यांच्या श्रद्धास्थान वर बोलण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल बागेश्वर बाबाला करत महात्मा गांधीवर बोलण्याची लायकी आहे का असा सवाल कालीचरण महाराज यांना केला आहे. तर या राज्यात भाजपचा राजा माणूस काय येतो मुसलमानांना वाटेल ते बोलतो, त्याच्या मिरवणुकीत नथुराम गोडसेचं पुस्तक लावलं जात. मात्र कारवाई होत नाही. का तर तो सरकारचा आमंत्रित माणूस. पोलिसांना राग येतो, दिसतं त्यांना. पण काय करणार ते तर हुकुम के ताबेदार. ते करणार, असा टोला देखिल त्यांनी लगावला आहे.

Published on: Apr 02, 2023 03:12 PM