Ramdas Athawale | संसदेत चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या खासदारांना निलंबित केलं पाहिजे : रामदास आठवले

Ramdas Athawale | संसदेत चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या खासदारांना निलंबित केलं पाहिजे : रामदास आठवले

| Updated on: Aug 13, 2021 | 11:44 AM

विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून सभागृहाचं कामकाज बंद पाडले. राहुल गांधीही चुकीच्या पद्धतीने वागले आहेत. यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी मांडले.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना एका वर्षासाठी संसदेतून निलंबित करा, अशी मागणी रिपाईचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. राज्यसभेत नुकत्याच घडलेल्या धक्काबुक्कीचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून संसदेत घालण्यात येणाऱ्या गोंधळाविषयी उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांना लक्ष्य केले. राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. राहुल गांधीही चुकीच्या पद्धतीने वागले आहेत. यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी मांडले.

Published on: Aug 13, 2021 11:44 AM