Ramdas Athawale : मीरा बोरवणकरांच्या अजितदादांवरील आरोपांवर रामदास आठवले यांचं मिश्कील भाष्य

Ramdas Athawale : मीरा बोरवणकरांच्या अजितदादांवरील आरोपांवर रामदास आठवले यांचं मिश्कील भाष्य

| Updated on: Oct 17, 2023 | 1:19 PM

VIDEO | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या 'मॅडम कमिश्नर' या पुस्तकाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. या पुस्तकातील जमीन व्यवहाराच्या प्रकरणामुळे चर्चांना उधाण आलंय. बोरवणकर यांनी अजितदादांवर केलेल्या आरोपांवर रामदास आठवले म्हणतात...

चंद्रपूर, 17 ऑक्टोबर 2023 | पुण्यातील येरवड्यातील पोलिसांच्या जमिनीच्या लिलावाचा दादांनी निर्णय घेतला होता, माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २०१० सालच्या प्रकरणाचा या पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर पुस्तक प्रकरणावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. कारागृहाच्या एवढ्या जवळ इमारत बांधू नये, अन्यथा कारागृहात जावे लागते, असे वक्तव्य रामदास आठवले यांनी केले. इतकेच नाही तर अजित पवार यांच्यावर करण्यात आलेल्या मॅडम कमिशनर या पुस्तकातून मीरा बोरवणकर यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांनतर अजित दादांनी तेव्हाची स्थिती स्पष्ट करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Oct 17, 2023 01:19 PM