Ramdas Athwale यांचं उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर; म्हणाले, ‘…त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतः गॅसवर’
VIDEO | उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेवर रामदास आठवले यांचा पलटवार, यासोबतच '...आम्ही 350 रन काढून जिंकणारच', रामदास आठवले यांनी नेमका काय व्यक्त केला विश्वास? बघा काय म्हणाले
जळगाव, 31 ऑगस्ट 2023 | केंद्र सरकार गॅसवर असल्याने म्हणून केंद्र सरकारने गॅसचे दर कमी केल्याची सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याकडील 40 आमदार हे आमच्याकडे आले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे स्वतःच गॅसवर असल्याचे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान इंडियाच्या बैठकीवरूनही रामदास आठवले यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी आम्हाला अडचण नाही विरोधकांनी प्रयत्न करावा, असे म्हणत आम्ही सामना करण्यासाठी सज्ज आहोत. येणाऱ्या 2024 मधील निवडणुकांमध्ये आम्ही 350 रन काढून जिंकल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे

'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार

संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय

जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
