Ramdas Athawale | प्रताप सरनाईक यांनी योग्य भूमिका मांडली - रामदास आठवले

Ramdas Athawale | प्रताप सरनाईक यांनी योग्य भूमिका मांडली – रामदास आठवले

| Updated on: Jun 20, 2021 | 8:49 PM

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपबरोबर जुळवून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. रामदास आठवले यांनी त्याचं स्वागत केलं आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपबरोबर जुळवून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्याचं स्वागत केलं आहे. सरनाईक यांची सूचना योग्यच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रातून बाहेर येऊन भाजपशी युती करावी, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे. रामदास आठवले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेना आणि भाजपने युती करावी अशी स्वागतार्ह भूमिका मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेचे आपण स्वागत करीत असून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशी युती करावी, असे आवाहन आठवले यांनी केले. (Ramdas Athawale says Pratap Saranaik played the right role)