ठाकरे पुन्हा सांगतो काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागू नका, अहो आंबेडकर भाजपसोबत या, रामदास आठवले यांचं पुन्हा आवाहन

“ठाकरे पुन्हा सांगतो काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागू नका, अहो आंबेडकर भाजपसोबत या”, रामदास आठवले यांचं पुन्हा आवाहन

| Updated on: May 29, 2023 | 8:07 AM

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना भाजपसोबत यावं असं आवाहन केलं आहे. शिर्डीमध्ये आरपीआय आठवले गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी वंचित बहुन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी इकडे, तिकडे फिरू नये, ठाकरेंसोबत राहून तुम्हाला काही मिळणार नाही आहे.

अहमदनगर : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना भाजपसोबत यावं असं आवाहन केलं आहे. शिर्डीमध्ये आरपीआय आठवले गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी वंचित बहुन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी इकडे, तिकडे फिरू नये, ठाकरेंसोबत राहून तुम्हाला काही मिळणार नाही आहे. तुम्ही माझ्यासोबत या. मी तुम्हाला पंतप्रधान मोदी यांच्याकडे घेऊन जातो. आपण दोघांनी मिळून पंतप्रधान मोदी, भाजपसोबत राहू या. शिंदे-फडणवीस सरकारसोबत एकत्र राहूया, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी काँग्रे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नादी लागू नये. 2024 मध्ये भाजपा आणि घटकपक्ष मिळून 350 जागा मिळवू, असेही रामदास आठवले म्हणाले.

Published on: May 29, 2023 08:07 AM