Video : रामदास कदम कोकणाचा ढाण्या वाघ, Thane मध्ये लागले बॅनर
आता शिवसेनेतील अंतर्गत वाद बॅनरबाजीच्या रुपाने चव्हाट्यावर येत असल्याचं पाहायला मिळतंय. रामदास कदम यांचा फोटो असलेला एक बॅनर ठाण्यातील नितीन कंपनी चौकात लावण्यात आलाय. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो आहेत. मात्र, शिवसेनेचा उल्लेख नाहीत. इतकंच नाही तर या बॅनरवर एक मजकूरही लिहिण्यात आला आहे.
कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावरुन शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यातूनच रामदास कदम यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात नो एन्ट्री, अशा बातम्याही समोर आल्या होत्या. त्यानंतर आता शिवसेनेतील अंतर्गत वाद बॅनरबाजीच्या रुपाने चव्हाट्यावर येत असल्याचं पाहायला मिळतंय. रामदास कदम यांचा फोटो असलेला एक बॅनर ठाण्यातील नितीन कंपनी चौकात लावण्यात आलाय. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो आहेत. मात्र, शिवसेनेचा उल्लेख नाहीत. इतकंच नाही तर या बॅनरवर एक मजकूरही लिहिण्यात आला आहे.
कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक आज आमचीच सुपारी द्यायला निघाले आहेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करुन देतो बाप बापच असतो… असा मजकूर या बॅनरवर पाहायला मिळत आहे. या बॅनरवर रामदास कदम यांचा मोठा फोटो लावण्यात आलाय. तर त्यांच्या फोटोमागे डरकाळी फोडणाऱ्या वाघाचं चित्रही काढण्यात आलं आहे. रामदास कदम यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवरील मजकूर कुणाला उद्देशून आहे? कुणी कुणाची सुपारी दिली? अशी चर्चा आता ठाणे आणि परिसरात सुरु झाली आहे.