Ramdas Kadam : ‘मी वाट बघतोय, ते तोंड कधी उघडतात’ रामदास कदम यांचं भास्कर जाधव यांना चॅलेंज
Ramdas Kadam on Bhaskar Jadhav : 'मी बेईमान आहे, कृतघ्न आहे, असे आरोप त्यांनी माझ्यावर केले आहेत. मी जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासबत भाषण केलं तेव्हा उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मांडीवर बसले नव्हते', अशा शब्दांत रामदास कदम यांनी टोला लगावला आहे.
रत्नागिरी : शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आव्हान दिलंय. मी वाट बघतोय, भास्कर जाधव कधी तोंड उघडतात ते, असं म्हणत कदम यांनी जाधवांना चॅलेंज केलंय. ‘मी बेईमान आहे, कृतघ्न आहे, असे आरोप त्यांनी माझ्यावर केले आहेत. मी जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाषण केलं, तेव्हा उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मांडीवर बसले नव्हते’, अशा शब्दांत रामदास कदम यांनी टोला लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्ही वाचवत आहोत, असंही ते म्हणाले. शिवसेना मला तुमच्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत त्यांनी भास्कर जाधव यांना सुनावलंय. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल केलाय.