ठाण्यात रामदास कदम यांच्या समर्थनार्थ कोकणचा ढाण्या वाघ उल्लेख असलेली पोस्टरबाजी

ठाण्यात रामदास कदम यांच्या समर्थनार्थ कोकणचा ढाण्या वाघ उल्लेख असलेली पोस्टरबाजी

| Updated on: Oct 17, 2021 | 3:51 PM

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावरुन शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यातूनच रामदास कदम यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात नो एन्ट्री, अशा बातम्याही समोर आल्या होत्या.

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावरुन शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यातूनच रामदास कदम यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात नो एन्ट्री, अशा बातम्याही समोर आल्या होत्या. त्यानंतर आता शिवसेनेतील अंतर्गत वाद बॅनरबाजीच्या रुपाने चव्हाट्यावर येत असल्याचं पाहायला मिळतंय. रामदास कदम यांचा फोटो असलेला एक बॅनर ठाण्यातील नितीन कंपनी चौकात लावण्यात आलाय. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो आहेत. मात्र, शिवसेनेचा उल्लेख नाहीत. इतकंच नाही तर या बॅनरवर एक मजकूरही लिहिण्यात आला आहे.