अखेर ठरलं! 'या' दिवशी होणार नवे राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी

अखेर ठरलं! ‘या’ दिवशी होणार नवे राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी

| Updated on: Feb 16, 2023 | 8:25 PM

VIDEO | नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे उद्या मुंबई होणार दाखल

मुंबई : येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती असून त्यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार असे म्हटले जात होते. मात्र आता १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी होणार आहे. नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस उद्या मुंबईत दाखल होणार असून राजशिष्ठ विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपाल पदाचा राजीनामा रविवारी मंजूर करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला. त्यांच्या जागी आता रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा फुले आदी महापुरुषांचा अवमान कोश्यारी यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील जनतेने चीड व्यक्त करत राज्यपालांचे पुतळे जाळले होते. ठिकठिकाणी निदर्शने आणि आंदोलनेही होत होती. त्यामुळे राज्यपालांना अखेर पायउतार व्हावे लागले होते.

Published on: Feb 16, 2023 08:25 PM