राणा प्रकरण ! कोर्टात वकिलांचा घमासान युक्तिवाद

राणा प्रकरण ! कोर्टात वकिलांचा घमासान युक्तिवाद

| Updated on: Apr 30, 2022 | 6:17 PM

राणा दाम्पत्य हे निवडून आलेले नेते असून ते कुठेही पळून जाणार नाहीत, त्यामुळे त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये. दोघांना 8 वर्षांची मुलगी आहे. दोघांवर काही अटी लादल्या जाऊ शकतात पण त्यांना जामीन हा मजूर केला पाहिजे, अशी मागणी त्यांच्या वकीलाने केली. त्याचबरोबर मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा पठण देशद्रोह नाही असंही वकील म्हणालेत.

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये आहेत. आज कोर्टात (Court) वकिलांमध्ये घमासान युक्तीवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. राणा दाम्पत्याच्या वतीने ज्येष्ठ वकील रिझवान मर्चंट आणि आबाद पोंडा न्यायालयात युक्तीवाद करत आहेत. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी जबाब नोंदवताना राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केल्याची माहिती आहे. राणा यांच्या वकिलाने सुनावणीदरम्यान सांगितले की, राणा दाम्पत्य हे निवडून आलेले नेते असून ते कुठेही पळून जाणार नाहीत, त्यामुळे त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये. दोघांना 8 वर्षांची मुलगी आहे. दोघांवर काही अटी लादल्या जाऊ शकतात पण त्यांना जामीन हा मजूर केला पाहिजे, अशी मागणी त्यांच्या वकीलाने केली. त्याचबरोबर मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा पठण देशद्रोह नाही असंही वकील म्हणालेत.