राणा दाम्पत्यांच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला !

राणा दाम्पत्यांच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला !

| Updated on: Apr 30, 2022 | 6:32 PM

दोघांवर काही अटी लादल्या जाऊ शकतात पण त्यांना जामीन हा मजूर केला पाहिजे, अशी मागणी त्यांच्या वकीलाने केली. त्याचबरोबर मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा पठण देशद्रोह नाही असंही वकील म्हणालेत.

मुंबई : राणा दाम्पत्यांच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण झालीये पण निकाल सोमवारी देण्यात येणार आहे. कोर्टाने हा निकाल राखून ठेवलाय, हा निकाल आता सोमवारी लागणार आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये आहेत. आज कोर्टात (Court) वकिलांमध्ये घमासान युक्तीवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. राणा यांच्या वकिलाने सुनावणीदरम्यान सांगितले की, राणा दाम्पत्य हे निवडून आलेले नेते असून ते कुठेही पळून जाणार नाहीत, त्यामुळे त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये. दोघांना 8 वर्षांची मुलगी आहे. दोघांवर काही अटी लादल्या जाऊ शकतात पण त्यांना जामीन हा मजूर केला पाहिजे, अशी मागणी त्यांच्या वकीलाने केली.पण आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार जमिनीवरील सुनावणी पूर्ण होऊन निकाल येत्या सोमवारी देण्यात येणार आहे.