Bhandara | आषाढी एकादशीनिमित्त बस स्थानकात साकारली रांगोळी
सध्या रांगोळी पाहण्यासाठी लांबून नागरिक येत असून तिथं चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर काढलेल्या रांगोळी सोबत अनेकांनी फोटो देखील काढले असल्याची माहिती मिळाली आहे.
भंडाऱ्यातील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांनी आषाढी एकादशी निमित्त साकारली एस टी बस स्थानकात पंढरीच्या वारीची थ्रीडी रांगोळी काढली आहे. भंडारा बस स्थानात येणाऱ्या प्रवासाच्या डोळ्याचे पाळने फेडणारी हि रांगोळी असून चित्रा याना हि रांगोळी साकारायला ५ दिवसाचा कालावधी तसेच ५० किलो रंग लागला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सध्या रांगोळी पाहण्यासाठी लांबून नागरिक येत असून तिथं चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर काढलेल्या रांगोळी सोबत अनेकांनी फोटो देखील काढले असल्याची माहिती मिळाली आहे.