रावसाहेब दानवे, भागवत कराड, संदीपान भुमरे यांनी टपरीचा चहा, मिसळवर मारला ताव

रावसाहेब दानवे, भागवत कराड, संदीपान भुमरे यांनी टपरीचा चहा, मिसळवर मारला ताव

| Updated on: Feb 27, 2023 | 10:41 PM

VIDEO | छत्रपती संभाजी नगरमध्ये आलेल्या G 20 मधील पाहुण्यांचा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पाहुणचार, बघा व्हिडीओ

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये आज G 20 परिषदेचं शिष्टमंडळ दाखल झालं आहे. या शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी औरंगाबादमधील तिन्ही मंत्री सज्ज झाले आहेत. या शिष्टमंडळाचं स्वागत केल्यानंतर रावसाहेब दानवे, भागवत कराड, संदीपान भुमरे यांनी टपरीचा चहा, मिसळवर मारला ताव मारल्याचे दिसून आले. आजपासून औरंगाबाद शहरात G 20 शिष्टमंडळाच्या पाहणीला सुरुवात झाली असून G 20 शिष्टमंडळ आज सकाळी औरंगाबाद विमानतळावर दाखल झालं. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी या शिष्टमंडळाचे विमानतळावर उपस्थित राहून स्वागत केलं. तर महाराष्ट्रीयन परंपरेनुसार ढोल ताशे वाजवत आणि लेझीम खेळत या शिष्टमंडळाचे स्वागत करण्यात आलं. आजपासून हे शिष्टमंडळ औरंगाबाद शहरातील वेगवेगळी ऐतिहासिक ठिकाणे आणि महत्त्वाच्या स्थळांना भेटी देणार आहेत.

Published on: Feb 27, 2023 10:41 PM