पालिका प्रशासनाला आमचा आक्रोश ऐकावाच लागेल- रावसाहेब दानवे
जालना शहरात आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी प्रश्न पेटला आहे. शहरातील दोन्ही जलाशयांमध्ये पाणी उपलब्ध असतानाही पंधरा दिवसा आड पाणी येतं. तसेच अंतर्गत जलवाहिनी उशीराने होत आहे.
औरंगाबादनंतर जालन्यात भाजपतर्फे जलाक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. सकाळी 11 वाजेनंतर शेकडो कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवत पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. “जालन्यात 12 दिवस पाणी येत नाही. आमच्या सरकारमध्ये आम्ही वितरण व्यवस्थेसाठी निधी मंजूर केला. आम्ही लोकांचा चेहरा बनून हा मोर्चा काढला आहे. कुणीतरी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळे आम्ही जालनेकरांचा आवाज बनून पुढे आलो आहोत, पालिका प्रशासनाला आमचा आक्रोश ऐकावाच लागेल,” असं रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले. जालना शहरात आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी प्रश्न पेटला आहे. शहरातील दोन्ही जलाशयांमध्ये पाणी उपलब्ध असतानाही पंधरा दिवसा आड पाणी येतं. तसेच अंतर्गत जलवाहिनी उशीराने होत आहे.