सरकार त्यांच्या हातात, उपाययोजना करणं आमचं काम नाही – रावसाहेब दानवे
आमच्या हाती सत्ता द्या आम्ही उपाययोजना करू असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. त्याचबरोबर जालन्यात सुरु असलेल्या जलाक्रोश मोर्चात आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप स्तुतीसुमने उधळलीयेत.
जालना: जलआक्रोश मोर्चा दरम्यान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी मविआ सरकारवर निशाणा साधलाय. आमचं काम हे जनतेचे प्रश्न सरकार दरबारी नेण्याचं आहे. आमच्याकडे लाख उपाययोजना आहेत पण सरकार आमचं नाही. आमच्या हाती सत्ता द्या आम्ही उपाययोजना करू असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी सरकारवर (Government)निशाणा साधलाय. त्याचबरोबर जालन्यात सुरु असलेल्या जलाक्रोश मोर्चात आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप स्तुतीसुमने उधळलीयेत. हजारोंच्या संख्येने भाजप (BJP) कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक या मोर्चात सहभागी झालेआहेत.
Published on: Jun 15, 2022 04:33 PM
Latest Videos