VIDEO : Cabinet Expansion | रावसाहेब दानवेंनी स्वीकारला मंत्रीपदाचा पदभार
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल झाला. मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याची काल जशी चर्चा होती, तशीच राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांवरही काल चर्चा सुरू होती.
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल झाला. मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याची काल जशी चर्चा होती, तशीच राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांवरही काल चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून संजय धोत्रे, प्रकाश जावडेकर आणि रावसाहेब दानवे यांनीही राजीनामा दिल्याची चर्चा होती. त्यात सर्वाधिक चर्चा रंगली ती रावसाहेब दानवेंची. रावसाहेब दानवे यांची कामगिरी चांगली नसल्याने त्यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा होती. पण झालं उलटच. प्रत्यक्षात दाजींना लॉटरी लागली. तीही रेल्वे राज्यमंत्रीपदाची
Latest Videos